वैजापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

वैजापूर,२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शहरातील विविध संघटना व जयंती उत्सव समितीच्यावतीने  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती वैजापूर शहर व तालुक्यात सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आली. या निमित्ताने मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी एकत्र येऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्यास्मृतीस अभिवादन केले. 

आमदार रमेश बोरणारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेरखान, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष अकिल सेठ ,नगरसेवक दशरथ बनकर यांनी प्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहराच्या लौकीकात भर टाकणारा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा लवकरच बसविला जाईल असे पालिकेच्यावतीने डॉ.दिनेश परदेशी व साबेरखान यांनी यावेळी जाहीर केले. या पुतळ्याच्या सुशोभीकरणचा खर्च माझ्या फंडातून केला जाईल असे आश्वासन आ. रमेश बोरणारे यांनी दिले. प्रास्ताविक धर्मेंद्र त्रिभुवन व विलास म्हस्के यांनी केले सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.शहराच्या सांस्कृतिक व साहित्यिक इतिहासात मोलाची भर टाकून नगरपरिषद थोर समाजसुधारक यांचा वारसा जपण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करीत असल्याबद्धल नगरपरिषदेला त्यांनी धन्यवाद दिले.या प्रसंगी नगरसेवक गणेश खैरे, शैलेश चव्हाण, इम्रान कुरेशी, दिनेश राजपूत, पारस घाटे,ज्ञानेश्वर टेके, राजेश गायकवाड, बबन त्रिभुवन, हरिभाऊ बागुल, मधुकर त्रिभुवन यांच्यासह शहरातील सर्व थरातील नागरिक उपस्थित होते. सायंकाळी शहरातील विविध भागातून जयंती मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा थोरात, धर्मेंद्र त्रिभुवन, संदीप गरुड, रवी पगारे, अविनाश त्रिभुवन, विलास म्हस्के, चंद्रकांत त्रिभुवन, सागर अस्वले, विजय त्रिभुवन, विकास सोळसे, राहुल त्रिभुवन आदींनी पुढाकार घेतला.