वैजापुरात आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांची तपासणी ; 25 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस

वैजापूर,२९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयात आरोग्यविषयक नियम व निकष पाळले जातात की नाही यासंदर्भात आरोग्य विभागाने तपासणी मोहीम राबविली असता 65 पैकी 25 रुग्णालयात गैरव्यवस्थापन आढळून आले असून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांनी या रुग्णालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या रुग्णालयांना आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार त्रुटी आणि निकषांची पूर्तता करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्रुटींची पूर्तता न केल्यास रुग्णालयाचा परवाना निलंबित करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय कार्यक्षेत्रात खासगी वैद्यकीय सेवा करण्यासाठी महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम 2021 लागू असून या कायद्यातील कलम 9 मधील तरतुदीनुसार वर्षातून दोनदा पालिका आणि पंचायत क्षेत्रातील नोंदणीकृत खासगी वैद्यकीय आस्थापना तपासण्याची जबाबदारी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे यांनी दिली आहे. त्यानुसार वैजापूर पालिका क्षेत्रातील 65 खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे.

नूतनीकरणासाठी पुनश्च नोंदणी केली नसल्याचे बहुतांश ठिकाणी आढळून आली त्यापैकी काही रुग्णालयाने खुलासा सादर केल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन तारपे यांनी दिली. 
परवाना नूतनीकरण नाही
आरोग्य विभागाकडे बॉम्बे नर्सिंग ऍक्टनुसार खासगी प्रॅक्टिस करण्यासाठी नोंदणी केलेल्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे की बंद याची शहानिशा करून पुर्ननोंदणीचा कालावधी संपुष्टात आला की नाही यासंदर्भात प्रामुख्याने पडताळणी करण्यात आली.काही रुग्णालयांनी परवाना नूतनीकरण केला नसल्याचे आढळून आले.असे डॉ.टारपे यांनी सांगितले.शहरातील आधार हाँस्पिटल ( डॉ. ईश्वर अग्रवाल), विठ्ठल हाँस्पिटल ( डॉ. दत्ता सांळुके) पाटील हाँस्पिटल ( श्रेयस पाटील) सुमनांजली नेत्र ( डॉ. संतोष संघवी) मोहन हाँस्पिटल ( डॉ.मोहन दगू ) संजीवन हाँस्पिटल ( नय्युम अजीज पटेल) ओम बाल रुग्णालय ( डॉ. प्रितेश शिंदे) जागृती हाँस्पिटल (डॉ.पंकज संचेती) श्री. दत्त हाँस्पिटल ( डॉ. दिनेश राजपूत) महाडीक हाँस्पिटल ( डॉ.धनंजय महाडिक)यश क्लिनिक ( डॉ. अश्विन जोशी) कमल क्लिनिक ( डॉ. साईनाथ पेहरे ) पवार हाँस्पिटल ( डॉ. किशोर पवार) थोरात हाँस्पिटल ( डॉ. शत्रुघ्न थोरात, सोमवंशी हाँस्पिटल (डॉ.बापूसाहेब सोमवंशी) भारत हाँस्पिटल ( डॉ. गणेश जानराव) सिध्दीविनायक हाँस्पिटल ( डॉ. शरद जगताप) सहाणे हाँस्पिटल (डॉ. गणेश सहाणे) शिंदे हाँस्पिटल ( डॉ.अतुलकुमार शिंदे) जगधने हाँस्पिटल ( डॉ. जगधने) चिरंजीव हाँस्पिटल ( डॉ. एस. जी. मापारी) कदम, हाँस्पिटल ( डॉ. किरण झिंजुर्डे) नित्यसेवा हाॅस्पिटल ( स्वप्नील पाटील) साई हाॅस्पिटल ( डॉ. अमोल कदम) उत्तम हाॅस्पिटल ( डॉ. रविंद्र कोठारी ) या खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.