वाहतुकीचे नियम पाळा आणि मास्क घाला या विषयावर टेंडर स्माईल प्रि- स्कूलची जनजागृती
औरंगाबाद,११ डिसेंबर /प्रतिनिधी:- 94.3 माय एफएम ला 5 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ने टेंडर स्माईल च्या विद्यार्थ्यांनी दर्गा रोड आणि क्रांती चौक या चौकामध्ये लोकांना मास्क घाला आणि वाहतुकीचे नियम पाळा हा संदेश खूप चांगल्या पद्धतीने सांगितला.
वाहतुकीचे नियम जर पाळणार नाहीत तर यम रस्त्यामध्ये उभा आहे हे लोकांना दाखवून दिले. त्याचबरोबर जे नागरिक नियम तोडत आहेत त्यांना फुल देऊन गांधीगिरी करण्यात आली.

94.3 माय एफएम सोबत औरंगाबाद महापालिका , औरंगाबाद शहर पोलिस व वाहतूक पोलिस यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला.
नियम मोडाल तर डॉक्टरकडे जाणे अनिर्वाय आहे हे सांगण्यासाठी पाच वर्षाची रिशिका लाठी हिने डॉक्टरची वेशभूषा केली होती.
त्याचबरोबर ऍक्सीडेन्ट झाल्यानंतर यम रस्त्यातच उभा आहे त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवा हे पाच वर्षाच्या निषाद गिरी याने यमच्या वेशभूषेतुन दाखवले. झेब्रा क्रॉसिंगच्या मागे गाडी उभी करावी हा संदेश सोल्जर बनुन वेदांश नावंदर यांनी दिला.
त्याच बरोबर नियम आणि पोलिसांचा ठेव मान,नसता यमाचा आणि कोरोनाचा सुटेन बाण हा संदेश रुद्राक्ष भारती याने वाहतूक पोलिस बनुन दिला. शाळेचे मुख्याध्यापक रोहित गिरी यांनी सर्वांचे आभार मानले व मुलांचे कौतुक केले त्याचबरोबर 94.3 माय एफ एम च्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.