वसंत क्लब वैजापूरतर्फे जनरल बिपिन रावत यांच्यासह मृतांना श्रद्धांजली

वैजापूर,११ डिसेंबर /प्रतिनिधी :-तामिळनाडूत भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत व इतर 13 जणांना वसंत क्लब वैजापूरतर्फे शुक्रवारी श्रद्धांजली  वाहण्यात आली.क्लबचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.जी.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली श्रध्दांजलीचा कार्यक्रम झाला.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेजर सुभाष संचेती,जेष्ठ विधिज्ञ आसाराम रोठे, क्लबचे सचीव जफर ए.खान, डॉ.संतोष गंगवाल, बाजार समितीचे संचालक संजय पाटील निकम आदींची श्रध्दांजलीपर भाषणे झाली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, सरकारी अभियोक्ता नानासाहेब पाटील जगताप, डॉ.एस.एम.जोशी, खुशालसिंग राजपूत, पी.जी.पवार,प्रा.के.ए.मगर, जेष्ठ वकील प्रमोददादा जगताप, बाबुराव परदेशी, किरण त्रिभुवन, सचिन दहिभाते, राफे हसन, दत्तात्रय जाधव, खुशालसिंग राजपूत,भाऊसाहेब गलांडे, वसंत त्रिभुवन,बाळासाहेब जाधव, दिनेश राजपूत, गोपालदास आसर, तुषार भाटिया, डॉ.निलेश भाटिया, कय्युमसेठ सौदागर, घनश्याम वाणी, रहीम खान, प्रा.के.एम.बोरणारे, सुभाष बोहरा, राजू संघवी, सुर्यकांत सोमवंशी, सलीम वैजापुरी, बशीर सौदागर, महेश बुणगे, बळीराम राजपूत,पारस घाटे,लक्ष्मण वैष्णव, वसंतराव कदम, संजय तांदळे, सागर अस्वले यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.