वेरुळ लेण्यांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

औरंगाबाद ,२१जून /प्रतिनिधी :-आज वेरुळ  लेण्यांमध्ये भारतीय पुरातत्व सोसायटीच्या (एएसआय) औरंगाबाद सर्कलने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या प्रसंगी, डॉ. बिरी सिंह, उप अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तब्बल २० जण प्रशिक्षक  विलास बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७ वाजता एएसआयच्या सदस्यांनी ४५ मिनिटांच्या योग प्रात्यक्षिक सत्रात भाग घेतला.

यानंतर संगीत नाटक अकादमीच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम झाला.शास्त्रीय गायिका श्रीमती सहाना बॅनर्जी आणि सितार वादक पंडित रामदास पळसुले यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये भारतीय पर्यटन औरंगाबाद कार्यालचे  संचालक राम आणि काही पर्यटकांचा समावेश होता.
केंद्रीय संस्कृती मंत्रालय आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्याच्या  75 वर्षांच्या उत्सवाला जोडणारा “आझादी का अमृतमहोत्सव- योग एक भारतीय वारसा” या मोहिमेंतर्गत देशातील 75  ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन २०२१ साजरा  करण्यात आला.

या जागांपैकी महाराष्ट्रातील चार जागा मुंबईच्या कन्हेरी लेणी मोहिमेसाठी निवडल्या गेल्या आहेत; आगा खान पॅलेस, पुणे; ओल्ड हायकोर्ट बिल्डिंग, नागपूर आणि जागतिक वारसा स्थळ वेरुळ  लेणी, औरंगाबाद. या चारही स्थाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अंतर्गत राष्ट्रीय महत्त्व केंद्रे संरक्षित स्मारके आहेत.