गोयगाव – भऊर येथे 1 कोटी 50 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे आ.बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर ,२८ मे /प्रतिनिधी :-जलसंधारण विभागामार्फत वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदारसंघात सिमेंट बंधारे बांधकामासाठी 39 कोटी 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधींपैकी 1 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या वैजापूर तालुक्यातील गोयगाव – भऊर येथील सिमेंट बंधाऱ्याचे जलपूजन व लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते शनिवारी झाले.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोददादा जगताप, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, जिल्हा परिषदसदस्य रामहरीबापू जाधव, उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋषिकेश देशमुख, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, युवासेनेचे तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. बांधण्यात आलेला हा सिमेंट बंधारा पूर्णपणे भरला असून शेतकऱ्यांच्या विहिरी व कुपनलिकांच्या पाण्यात वाढ होऊन या परीसरातील पिण्याच्या पाण्याची व शेतकऱ्यांची शेती पाण्याची समस्या मिटली आहे. शेतकऱ्यांच्यादृष्टीने हा अतीशय महत्वाचा असा सिमेंट बंधारा झाला तो भरल्याने या परिसरातील शेतकरी समाधानी झाले आहेत. असे आ. बोरणारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कार्यक्रमास शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, रावसाहेब जगताप, भिकन नाना लहामगे, विभागप्रमुख नानासाहेब थोरात, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील गलांडे, रविंद्र कसबे, सतिश खंडांगळे, शाखा अभियंता केतन साखरे, उपविभागप्रमुख सुनिल कारभार, संतोष मामा दौंगे, हरिभाऊ साळुंके, बंडू पाटील गायकवाड, विजय काळे, संभाजी पाटील जगताप, सरपंच गणेश पाटील मोटे, सुनिल जगताप, उध्दव बहिरट, नंदू  हारदे, छगन पाटील सावंत, प्रभाकर मते, दत्तुभाऊ सावंत, राहुल लांडे, अनिल न्हावले, दिपक कळंकर, बंडू पाटील आहेर, नवनाथ मोटे, जितेंद्र जगताप, शरद जाधव, मिथुन बहिरट, कार्तिक जगताप यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.