वैजापूरचे तापमान 41 अंशावर ; जीवाची लाही..लाही

वैजापूर,१२ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरावर सूर्याचा कोप कायम असून एप्रिलच्या प्रारंभापासूनच तापमानाचा पारा 41 अंशावर गेला आहे.सूर्य आग ओकू लागला असून उन्हाच्या तीव्रतेमुळे जीवाची लाही…लाही..होत आहे.

सोमवारी (ता.11) 41 अंश तापमानाची नोंद झाली.आगामी काही दिवसांत पारा 42 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्च महिन्यात 38 ते 40 अंश सेल्सियसची नोंद झाली होती. 29 मार्चपासून तालुक्यात 41 अंशाच्या पुढेच तपमान आहे. सकाळी दहा वाजल्यापासून सूर्य आग ओकू लागला असून दुपारच्यावेळी तीव्र उन्हाच्या तीव्रतेमुळे बाहेर पडणे मुश्किल होत आहे. रस्ते निर्मनुष्य होत असून जीवाच्या लाही..लाहीने शहरवासीय त्रस्त झाले आहेत.