वैजापूर विधानसभा मतदारसंघातील वरखेड ते अकोलीवाडगाव 33 केव्ही लाईन फिडर कामाचे लोकार्पण

वैजापूर ,१० जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर विधानसभा मतदारसंघातील वरखेड ते अकोलीवाडगाव येथील 5 कि.मी. 33 केव्ही लिंक लाईन फिडर कामाचे लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले. वरखेड ते अकोलीवाडगाव येथील 5 कि.मी. 33 केव्ही लिंक लाईन फिडरसाठी आ.बोरणारे यांच्या प्रयत्नाने 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.या निधीतून लाईन फिडरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

अकोली वाडगावं, शिंगी, पिंप्री, नरहरी रांजणगाव हे चारही गाव वरखेड सबस्टेशन येथून अमिनाबाद फिडरवर असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत होता. त्यासाठी आमदार बोरणारे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अकोलीवाडगाव हे अमिनाबाद फिडर पासून वेगळे करून 5 कि.मी. 33 केव्ही लिंक लाईन फिडरसाठी 37 लाख रुपये मंजूर करून आणले. 

या भागातील शेतकऱ्यांची या विद्युत वाहिनीची खूप दिवसापासूनची मागणी होती. वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर हा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला. या सब स्टेशन वर लोड निर्माण होणार नाही याकरिता आणखी एक 5 चा नवीन मंजूर करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आमदार बोरणारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्रावर ओव्हर लोड असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त असते त्यासाठी देखील डीपीडीसी मधून जास्तीत जास्त विद्युत रोहित्र मंजुर करून ते काम मार्गी लावण्याचे   आश्वासन आमदार बोरणारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतूरे, तालुकाप्रमुख तथा उपसभापती अनिल पाटील चव्हाण, उपकार्यकारी अभियंता दुशिंगे, उपतालुकाप्रमुख डॉ. प्रकाश शेळके, नानासाहेब धोत्रे, माजी उपसभापती शिवाजी पाटील बोडखे, बाजार समितीचे संचालक नारायण पाटील बारहाते, उमेश बारहाते, पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील डांगे, कनिष्ठ अभियंता खंबायतकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख कल्याण बारहाते, तालुकाप्रमुख सतीश हिवाळे, रामभाऊ धोत्रे, राजुभाऊ धोत्रे, रामनाथ वाघ, ऋषिकेश मनाळ, बाळासाहेब गडगुळे, विष्णू मनाळ, नानासाहेब काळे, सुनील म्हस्के, संतोष नाईक, रोहिदास जाधव, रामेश्वर चव्हाण, सचिन नवले, ईश्वर जानराव, गणेश चव्हाण, भावराव पवार, नवनाथ अशोक धोत्रे, अशोक जाधव, सचिन वालतुरे, हरीश वालतुरे, नंदु ढगे, कृष्णा नवले, कारभारी ढगे, रणजित वाघ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.