जगदंबा यात्रा महोत्सवात बुधवारी भव्य पालखी मिरवणूक

वैजापूर,४ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर शहराचे ग्रामदैवत व साडेतीन पीठ जुने इतिहास असणाऱ्या जगदंबा माता मंदिर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी जगदंबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी (ता.6) भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

शहरातील भाटिया गल्ली येथून सायंकाळी ही पालखी मिरवणूक निघणार असून आदिवासी नृत्यपथक हे मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. या जगदंबा यात्रामहोत्सवात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा महोत्सव कमिटीतर्फे करण्यात आले आहे.