मनसेच्या वैजापूर – गंगापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

वैजापूर,५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मराठवाडा संपर्क नेते दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे , संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण या तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बजाजनगर येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. दिलीप धोत्रे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र दिले.जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.अनिल वाळुंज यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा सचिव  बाळासाहेब घंगाळे, तालुका संघटक वैजापूर सुनील गायकवाड, वैजापूर शहराध्यक्ष  सोपान जाधव, वैजापूर शहर सचिव सचिन तुरे, महानगर अध्यक्ष बजाजनगर पाराजी चितळे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जयश्री बागुल ,महिला तालुकाध्यक्ष वैजापूर कविता दरेकर, बजाज नगर महिला आघाडी अध्यक्ष सुनीता जाधव, शहर संघटक गंगापूर मनोज पुंडेकर यांची निवड करण्यात आली.