वैजापूर येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्षासह इतरांचा भाजपमध्ये प्रवेश

वैजापूर,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेशानंतर भाजपाने शहरात पक्ष संघटनेचा व्यापक विस्ताराची भूमिका हाती घेतली आहे. पक्षात नवीन चेह-यांना प्रवेश देण्याचा कार्यक्रम शनिवारी (ता.17) येथील भाजपा कार्यालयात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत पार पडला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रेम राजपूत, प्रहार जनशक्तीचे शहराध्यक्ष नितीन तांबे, रेशन दुकानदार संघटनेचे सचिव जितेंद्र पवार, उमेश वाघ, वैभव पवार यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी  यांच्या  मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा प्रवेश समारंभ पार पडला. भाजप तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे, नगरसेवक दशरथ बनकर, डॉ.राजीव डोंगरे, कचरु डिके, मोहन आहेर, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक शैलेश चव्हाण, संतोष मिसाळ, गणेश खैरे, गोकुळ भुजबळ, अनिल वाणी , ज्ञानेश्वर इंगळे, निलेश पारख, शैलेश पोंदे, सोमु सोमवंशी, सोनू राजपूत, डॉ.हर्षल तोडरवाल, संदीप पवार, महेश भालेराव, किरण व्यवहारे, सणमीत खनिजो,सचिन दाढे, हमीद जिलानी, नदीम शेख, रुद्रा शेजवळ, दिपक पवार, अँड सूरज राजपूत, पवन विश्वासू, गोलू पंजाबी, जाकिर कुरेशी, योगेश फुलारे, रोनक पंजाबी, हर्षद राजपूत, मसूद शेख यांची यावेळी उपस्थिती होती. 

नगरपालिका निवडणूकीची तयारी जोरात

वैजापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आली आहे.त्या पार्श्वभूमीवर भाजपाने शहरात आता पासूनच पक्ष संघटनेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिल्याचा दिसून येतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार या दोन पक्षाचे शहराध्यक्षांना पक्षात आणण्याची कामगिरी शहर संघटनेने केली.