जीवनातील ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याची गरज – जे.के. जाधव

जाधव कॉलेज तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वैजापूर,१८ जुलै /प्रतिनिधी :-जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी  शैक्षणिक पातळीवरील विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.सखोल वाचन करावे व जीवनाचे ध्येय गाठावे.असे प्रतिपादन जेष्ठ नेते जे.के.जाधव यांनी केले. शहर व तालुक्यातील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोमवारी (ता.16) येथील जाधव कॉलेज मध्ये करण्यात आला. त्या प्रसंगी जाधव बोलत होते.

पालिकेचे  माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राजपूत व श्रीमती जयमाला वाघ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गुणगौरव प्रमाणपत्र व “मी विजेता होणारच” व यशाची गुरूकिल्ली ही पुस्तके प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशांत त्रिभुवन यांची कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ही यावेळी करण्यात आला. या प्रसंगी  व्यापारी सुनंदीलाल बोथरा, मंगेश भागवत, प्राचार्य श्री. भुजाडे,उप प्राचार्य सुनील कोतकर, सय्यद, देवकर यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी मोठयासंख्येने उपस्थित होते.