वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात “कोविड बूस्टर” डोस देण्यास आजपासून सुरुवात

नांदेड,१० जानेवारी / प्रतिनिधी :- येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविडचा बूस्टर डोस देण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. ज्यांना कोविड व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेऊन तीन महिने कालावधी झालेला आहे व ज्यांना तिसरा डोस घेण्यास एस.एम.एस.आलेला आहे अशांना बूस्टर डोस देण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत शहरातील जेष्ठ नागरीक बालमुकुंद वेद व सोन्याबापू गावडे यांना परिचारिका उर्मिला जाधव व मनीषा गायकवाड यांनी कोविड लस देऊन बुस्टर डोस देण्यास आरंभ केला त्यांना मंगेश मापारी व श्याम उचित यांनी सहकार्य केले.

Displaying IMG-20220110-WA0097.jpg

नगरपरिषदेच्या भगवान महावीर रुग्णालयातही सोमवारपासून बूस्टर डोस देण्यात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता निकाळे यांनी सांगितले. शहरातील व तालुक्यातील साठ वर्ष वय असलेल्या महिला व पुरुषांनी दुसऱ्या डोस नंतर तीन महिने झाले असतील व त्यांना एस.एम.एस आला असेल तर त्यांनी बूस्टर डोस घेऊन आपले आरोग्य सुरक्षित करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे अधिकच्या लसीची मागणी करावी कारण या दोन्ही लसीचा शहरात मोठया प्रमाणात तुटवडा आहे.असे श्री.राजपूत म्हणाले. शहरात कोविड रुग्ण संख्या आज 28 वर पोहचली आहे  नागरिकांनी मास्क वापरावा,सुरक्षित अंतर ठेवावे, गर्दी टाळावी, सॅनिटायझर वापरावे व शासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे.