जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत लोकनेता स्व.आर.एम.वाणी युवा मंच क्रिकेट क्लब विजेता

वैजापूर,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत लोकनेता स्व.आर.एम.वाणी युवा मंच क्रिकेट क्लब विजेता ठरला. पहिले पारितोषिक 2 लाख रुपये व चषक त्यांनी पटकावला तर द्वितीय पारितोषिक 1लाख 51 हजार रुपये बोरणारे वॉरियर्सला मिळाले. 

विजेत्या संघांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश  टोपे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील साहेब यांच्या जन्मदिवसानिमीत्त आयोजित भव्य दिव्य मराठवाड्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राज्याचे लोकप्रिय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडला.

या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर होते. बक्षीस वितरण प्रसंगी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे,  आमदार  रमेश पाटील बोरनारे, माजी आमदार सुभाष झांबड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, गंगापूरचे युवानेते संतोष माने, माजी नगराध्यक्ष साबेर खान,बाळासाहेब संचेती, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकिल सेठ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रतापराव निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Displaying IMG-20220221-WA0103.jpg

या स्पर्धेला आमदार निलेश लंके (पारनेर) ,आमदार सतीश चव्हाण यांनी देखील भेट दिली. बक्षीस वितरण सोहळ्यात बोलताना टोपे म्हणाले की, मी आजवर अनेक ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बघितल्या परंतु वैजापूर येथे स्पर्धेचे जे आयोजन चिकटगावकर यांनी केलं ते खरंच कौतुकास्पद आहे. ही स्पर्धा आजपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून जवळपास एक लाख लोकांनी बघितली आणि आज स्पर्धेला अंतिम दिवशी आठ ते दहा हजार लोकांची उपस्थिती आहे हेच खरं या स्पर्धेचे यश आहे. 

Displaying FB_IMG_1645442683417.jpg

क्रिकेट स्पर्धेचे प्रथम बक्षीस लोकनेते स्व.आर. एम. वाणी युवामंच क्रिकेट क्लब, द्वितीय बक्षीस बोरणारे वारियर्स, तृतीय बक्षीस सहारा कॉटन तर चतुर्थ बक्षीस गणेश सीसी या संघाने पटकावले. 

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पवार, रिखबशेठ पाटणी, राजेंद्र पाटील मगर, साईनाथ मतसागर, प्रभाकर बारसे, बाळासाहेब भोसले, मंजाहारी गाढे, प्रताप दादा धोंडे, गणेश चव्हाण, अण्णा चौधरी, रवी पाटणे, संजय सूर्यवंशी ,शैलेश सुराशे, विशाल शेळके, अशोक म्हस्के, एडवोकेट प्रदीप चंदने, गणेश निकम ,आर के पाटील, भागवत निकम, विठ्ठल सावळे, बापू साळुंखे, सागर गायकवाड, राहुल साळुंके, अमोल बावचे, प्रवीण साबळे ,सुदर्शन सोनवणे, सम्राट राजपूत, अनिल धुळे, लखन त्रिभुवन, अक्षय बुट्टे, सलीम शेख, ओमकार देसाई, साहिल खिल्लारी, आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवानेते अजय चिकटगावकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, शहराध्यक्ष प्रेम राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले .आभार स्पर्धेचे अध्यक्ष अजय पाटील चिकटगावकर यांनी मानले.