शाळापूर्व तयारीसाठी पात्र विद्यार्थी व पालकांचा वैजापूर शहरात मेळावा

वैजापूर,१८ एप्रिल  /प्रतिनिधी :- येत्या जून मध्ये जरी नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळासुरू होत असल्या तरी मराठी जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा व अन्य शाळात शासनाच्या सूचनेनूसार संपूर्ण राज्यात सोमवार रोजी शाळा पूर्व तयारी म्हणून पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा मेळावा घेऊन विद्यार्थ्यांच्या क्षमता बघण्यात आल्या.

शारीरिक व बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी या क्षमताचे निरीक्षण करण्यात येऊन विद्यार्थी वर्ग प्रवेश चा पहिला मेळावा पालकांसह झाला.या शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे उदघाटन माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत व नगरसेवक दशरथ बनकर यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी.जी.राजपूत होते. सूत्र संचलन बी.बी.जाधव यांनी केले तर आभार सुवर्णा बोर्डे यांनी मानले.

अंगणवाडी शिक्षिका मनीषा चव्हाण, वैशाली बागुल तसेच शिक्षिका नीता पाटील,लता सुखासे, ज्योती दिवेकर, सुनीता वसावे, वैशाली शेलार, राजश्री बंड, संदीप शेळके, श्री. रावकर, श्री. तगरे, श्रीमती त्रिभुवन यांनी यावेळी सहभाग नोंदविला.