समृध्दी महामार्गावर जांबरगाव शिवारात चोरट्यांची कारवर दगडफेक ; कारमधील महिला जखमी

वैजापूर ,१४ मार्च / प्रतिनिधी :- शिर्डीहुन साईबाबाच्या दर्शन घेवून नागपुरकडे निघालेल्या कुटुंबाच्या कारवर चोरट्यांनी दगडफेक केल्याने कार मधील एक महिला जख्मी झाल्याची घटना सोमवारी (ता.13) रात्री दहा वाजेच्या सुमारास समृद्धि महामार्गावर असलेल्या तालुक्यातील जांबरगाव शिवारात घडल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, या घटनेनंतर वैजापुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने महामार्गावर नाकेबंदी करत आरोपीची शोध मोहिम सुरु केली आहे.या घटनेत जखमीना उपचारासाठी शहरातील खासगी द्वाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यापासून शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकुळ घातले आहे. त्यामुळे वैजापूरकरांची झोप उडाली आहे. काही केल्या या घटनांना ‘ब्रेक’ लागेनासा झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली असून चोरट्यांना अटक करण्यासाठी विशेष पथकही स्थापन करण्यात आले आहे.दरम्यान, सोमवारी रात्री चोरट्यांनी चक्क समृद्दि महामार्गावर धावत्या वाहनावर दगडफेक करून लूटमारीचा प्रयत्न केल्याने नागपुरकडे जाणाऱ्या कारची काच फुटून एक महिला जखमी झाली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत गीते,योगेश झालटे यांनी घटनास्थळी धाव घेवून चोरट्यांनी शोध मोहिम सुरु केली आहे.

कारचालकाचे प्रसंगावधान

चोरटे रस्त्यावर येवून कारवर दगडफेक करून कार रोखण्याचा प्रयत्न करत असताना चालकने कार सुसाट पुढे नेली. त्यामुळे चोरट्यांनी नंतर कारवर दगडफेक केली. जखमी भाविक जवळच्या पेट्रोलपंपावर पोहाेचले. घडलेला प्रकार सांगितल्यावर तेथील लोकांनी वैजापूर  पोलिसांना कळवले. नंतर पोलिसांनी महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले व आरोपीच्या शोध मोहिमसाठी पथकेही रवाना केली आहेत.