शिऊर पोलिसांची कारवाई ; देशी दारूची तस्करी करणारी टोळी पकडली, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

वैजापूर,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ग्रामीण भागात चोरट्या मार्गाने वाहनातून देशी दारुची तस्करी करणारी टोळी शिऊर पोलीसांनी मुद्देमालासह पकडण्याची धडक कारवाई शुक्रवारी सायंकाळी केली.पोलीसांनी दोन जणाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 97 हजाराचे 25 देशी दारुचे बाॅक्स व वाहन असा एकूण एक लाख 66 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाई विषयी हवालदार विशाल पैठणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव येथून दोन जण अल्टो कारमधून देशी दारुचा साठा वडजी चौफुली मार्गावरुन घेऊन जाणार असल्याची गुप्त महिती मिळाली महिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांयकाळी सहा वाजता वडजी चौफुली येथे सहाय्यक फौजदार आर. आर. जाधव, विशाल पैठणकर, गणेश जाधव , गणेश गोरक्ष यांनी वाहन अडवले.वाहनाची तपासणीत 25 देशी दारुचे बॉक्स आढळून आले. यातील शुभम शायरी चव्हाण वय 23 रा. रेल्वे स्टेशन ता. कोपरगाव, सतीश रघुनाथ ज-हाड 49 रा. शिंगणापूर कोपरगाव यांच्यावर अवैध दारुचा गुन्हा दाखल करण्यात आला.