वैजापूर येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक

वैजापूर,१८ जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील संत सावता महाराज मंदिर माळी गल्ली वैजापूरच्या वतीने सोमवारी (ता.17) संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

भजन, टाळ, मृदुंग वाजवत संकट मोचन मंदिरमार्गे निघालेली ही मिरवणूक शिवराई रस्त्यावरील प्रमिलाताई धुमाळ कार्यालय येथे पोहचल्यानंतर तेथे ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले परभणीकर यांचे  कीर्तन झाले.

याप्रसंगी व्यापारी संघटनेचे काशीनाथ  गायकवाड, विनोद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, डॉ. सुभाष भोपळे, बाबासाहेब गायकवाड, शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, जिजाबाई गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. संतोष गायकवाड, शशिकांत भालेराव, भरत गायकवाड, शांतीलाल पवार,पुंडलिक गायकवाड, प्रमोद राऊत, गोकुळ पेहरकर, ह.भ.प. डंबीर महाराज, यशवंत गायकवाड, रतीलाल गायकवाड यांनी सहभाग नोंदविला. 

रक्तदान शिबिर

संत शिरोमणी संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (ता.17) येथील धुमाळ मंगल कार्यालयात आदर्श ब्लड सेंटर, सोनिया चेंबर्स सेवन व्हील्स छत्रपती संभाजीनगर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तरुण युवकांनी चांगला प्रतिसाद देऊन सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.

सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत प्रथम रक्तदाते दयानंद सहदेव गायकवाड यांनी रक्तदान करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष भोपळे, आयोजक काशिनाथ गायकवाड, विनोद गायकवाड, पुंडलिक गायकवाड व शशिकांत भालेराव यांची उपस्थिती होती. आदर्श ब्लड सेंटर चे रवि तायडे, अनुराधा नांदरे, सागर साळवे, स्वाती शिंदे, शफिक शेख यांनी रक्त संकलन केले.