वैजापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचा श्री श्री संस्कार कोर्स ; 30 मुलांचा सहभाग

वैजापूर ,१७ जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चा श्री श्री संस्कार कोर्स वर्षा दिदी व सुनिल भैय्याच्या माध्यमातून संपन्न झाला. या कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कोर्समध्ये शहरातील 30 मुला- मुलींनी सहभाग घेतला होता. या कोर्समध्ये सहभागी मुला- मुलींसाठी कहानी, श्लोक, गेम, दादी का बटवा असे अनेक गोष्टी घेण्यात आल्या. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी अमर भाटिया, संदिप, योगेश खैरमोङे, वसुंधरा, परी, निर्भय, आराध्या,साक्षी, गार्गी व संस्कृती यांनी सहकार्य केले.