वैजापूर मतदारसंघातील 87 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,१८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर मतदारसंघात असलेल्या गंगापूर तालुक्यातील आगाठाण, महेबुबखेडा, भागाठाण व शंकरपूर येथील विविध विकास कामांसाठी आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने 87 लाख 45 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या विकास कामांचे भूमिपूजन आ.बोरणारे यांच्या हस्ते रविवारी (ता.18) झाले.

मौजे आगाठाण येथे जलजीवन योजनेअंतर्गत 15 लक्ष 12 हजार रुपये व दलित वस्ती परिसरात सिमेंट रस्ता 10 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन, मौजे महेबुबखेडा येथे जलजीवन योजनेच्या13 लक्ष 84 हजार रुपये निधीचे काम, शिवना नदी रस्ता 8 लक्ष रुपये, गावाअंतर्गत सिमेंट रस्ता 7 लक्ष रुपये, महादेव मंदीर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन. मौजे भागाठाण येथे जलजीवन 13 लक्ष 5 हजार रुपये व जगताप वस्ती रस्ता 7 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन. मौजे शंकरपूर येथे जलजीवन 6 लक्ष 44 हजार रुपये व दलित वस्ती परिसरात सिमेंट रस्ता 10 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन अशा एकुण 87 लक्ष 45 हजार रुपये निधी मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन  आमदार रमेश बोरणारे यांच्या हस्ते झाले.तसेच आगाठाण-भागाठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर निवडून आलेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन त्यांच्यासह सर्व संचालकांचा सत्कारही यावेळी आ.बोरणारे यांनी केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष काळवणे, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पाटील चव्हाण, अनिल पाटील चव्हाण, उपकार्यकारी अभियंता अपसिंगेकर , पंचायत समिती सदस्य बद्रिनाथ पाटील चव्हाण, माजी उपसभापती महेंद्र पाटील गंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.