वैजापूर येथे आयोजित आंतर महाविद्यालय हँडबाल स्पर्धेत 22 संघाचा सहभाग

वैजापूर, १० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या पुढाकारातून आंतर महाविद्यालय हँडबॉल स्पर्धा विनायकराव पाटील महाविद्यालयाचे मैदानावर दिनांक 7 ते 8 नोव्हेंबर दरम्यान झाल्या.या मैदानी स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समिती प्रमुख कृषी भूषण आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे ,उपप्राचार्य डॉ.दादासाहेब साळुंखे, विद्यापीठ निवड समिती सदस्य डॉ.बारी , डॉ. सचिन पगारे, डॉ. सत्यजित पगारे, डॉ. फेरोज सय्यद,  डॉ.आबासाहेब शिरसाठ, डॉ. आरिफ खान,क्रीडा मार्गदर्शक वैभव किरगत वेरुळकर यांची उपस्थित होती. 

या स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या 20 ते 22 महाविद्यालयाचे संघ  सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक उदय तगरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रशिक्षक भाऊसाहेब खरात यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. राहुल परदेशी  श्री चेतन साठे श्री शिवाजी गायकवाड प्रकाश बोराडे व महाविद्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.