निमगोंदगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी लहानुबाई डघळे यांची बिनविरोध निवड

वैजापूर, १० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील निमगोंदगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपदी शिंदे गटाचे श्रीमती लहानूबाई वाल्मिक डघळे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अशोक तांबुस यांच्या उपस्थितीत पार पडली. तलाठी जितेंद्र चापानेरकर , उपसरपंच भाऊसाहेब लक्ष्मण गायकवाड,राजेंद्र चव्हाण, ग्रामसेवक कदम यांनी सहकार्य केले. सरपंच निवड प्रक्रियेत ग्रा.पं सदस्य जिजाबाई राघुनाथ पाटील,  बबनबाई मोरे,  बाळू अल्हाट, सदस्यांनी निवड प्रक्रियेत भाग घेतला.

नवनिर्वाचित सरपंचाचे पॅनल प्रमुख कृ.उ.बाजारसमितीचे माजी उपसभापती राजेंद्र चव्हाण, पंढरीनाथ त्रिभुवन, हेमराज सामृत, श्री.काका मास्तर बबनराव सामृत, सोमनाथ पा.सामृत, रोहीदास सामृत, प्रेमराज पाटील, गणपती पाटील, यशवंतराव घायवट,येडूबा त्रिंबके, मधुकर पा.गायकवाड,रामचंद्र नळे, भास्कराव सामृत, दादाभाऊ त्रिभुवन , शिवाजी त्रिभुवन अरूण दरेकर, नानाभाऊ गायकवाड पाटील सामृत,  गोटीराम गायकवाड, तुकाराम पाटील गायकवाड, पंढरीनाथ सयाजी पाटील आदीसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.