वैजापूर येथील शिरीष डोंगरे यांची पुणे जिल्हयात गळफास घेऊन आत्महत्या

वैजापूर,२७ऑगस्ट  /प्रतिनिधी :-येथील ह्रदयरोगतज्ञ व भाजपचे डॉ. राजीव डोंगरे यांचे लहान बंधू शिरीष डोंगरे यांनी पुणे जिल्हयातील रांणजगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार रोजी उघडकीस आली. 

शिरीष बबनराव डोंगरे (49) हे यशवंत कॉलनी येथील रहिवासी होते.  शहरातील निवारानगरीत औषधालय चालवून ते उदरनिर्वाह करीत होते.शुक्रवारी सकाळी दहा वाजता बँकेत भरणा करून येतो. असे म्हणून  ते दुकानातून बाहेर पडले. मात्र ते पुन्हा परतलेच नाही. कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु ते सापडले नाही. अखेर त्यांचे वडील बबनराव डोंगरे यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसात दिली. याप्रकरणी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली. दरम्यान पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या ठिकाणी शिरीष डोंगरे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली.