वैजापूर येथे जिजाऊ ब्रिगेड व शिक्षक सेना महिला आघाडीतर्फे शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली

वैजापूर,२२ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :- येथे जिजाऊ ब्रिगेडतर्फे शिवजन्मोत्सव पूर्वसंध्येला भव्य मशाल रॅली काढून शहरातील महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.तसेच शिवजयंतीच्या दिवशी ‘जिजाऊ ब्रिगेड वैजापूर’ आणि ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना’ महिला आघाडी शाखा वैजापूर यांच्या संयुक्तविद्यमाने  भव्यदिव्य बाईक रॅली काढण्यात आली.

रॅलीचा शुभारंभ आमदार रमेश पाटील बोरणारे , नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा अर्चना शिंदे, रथ आयोजक मोती भाऊ वाघ, फकीर गलांडे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष जगदाळे, जयश्री जगदाळे यांच्या शुभहस्ते झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जिजाऊ वंदना झाली.

शालेय विद्यार्थ्यांचे वेशभूषा, पोवाडा,वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, पुस्तक, 201 रुपये पारितोषिक भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा अर्चना राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष डॉ. जयश्री महाडिक ,जयश्री जगदाळे, अनुराधा पवार, वैशाली मतसागर, सचिव सत्यभामा वाघ, उषा इंगळे, वर्षा शिंदे, सहसचिव सोनाली पवार, सल्लागार सुशीला घायवट, संघटक पुष्पा निखाडे, प्रसिद्धीप्रमुख मंदा गलांडे, श्रुती मोटर, संध्या वसईकर, सुरेखा पेदे, सुनिता कोळसे, दिपाली निकम, जयश्री गायकवाड, जयश्री काकडे, सुवर्णा पेदे, शितल , नम्रता , योगिता मतसागर, रूपाली पवार, जाधव , मनिषा कुमावत, मंजुषा यांची उपस्थिती होती.