वैजापूर येथील करुणा माता चर्चच्या प्रांगणात “पवित्र क्रऊस” तिर्थक्षेत्राचे भूमीपूजन

वैजापूर,१३ मार्च  /प्रतिनिधी :-येथील करुणा माता चर्चच्या प्रांगणात “पवित्र क्रऊसतिर्थक्षेत्राचा “भूमिपूजन सोहळा आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते रविवारी पार पडला. 

नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेरखान, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, कॅथॉलिक धर्म प्रांताचे महागुरू स्वामी रेव्ह, आम्ब्रॉज रिबेलो, फादर संजय ब्राह्मणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, कल्याण जगताप, वैजापूर येथील फादर संजय ब्राम्हणे, नगरसेक प्रकाश चव्हाण, डॉ.प्रीती भोपळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थितीत होते.आ.बोरणारे व नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांनी पेव्हर ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन बोलताना दिले. संजय  ब्राह्मणे व ग्रेसी ताई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी फादर जीवन येवले, रवींद्र वाघ, मार्था त्रिंभुवन, प्रहारचे ज्ञानेश्वर घोडके, राजेंद्र बागुल, प्रवीण खाजेकर, विलास म्हस्के, जी.एस.पारखे, विशाल शिंदे, प्राचार्य त्रिभुवन, अरुण शिंदे, नॅन्सी रोद्रीग्ज यांच्यासह शहर व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.