श्रीक्षेत्र सराला बेटाच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.बोरणारे यांचा सत्कार

वैजापूर,२० जानेवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या श्रीक्षेत्र सराला बेटच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून आणल्याबद्दल आ.रमेश पाटील बोरणारे यांचे वैजापूर शहरवासीयांतर्फे बुधवारी सत्कार करण्यात आला.

वैजापूर शहर व तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबध्द असून, औद्योगिक वसाहत, विनायक कारखाना व रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित व्हावी यासह विविध विकास प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.बोरणारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, प्रमोद कुलकर्णी आदींनी आ.बोरणारे यांच्या सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती विष्णुभाऊ जेजुरकर, वसंत क्लबचे सचीव जफर ए.खान, भाऊसाहेब पाटील गलांडे, बाळासाहेब जाधव,जिल्हा दूध संघाचे रहीम खान, कल्याण जगताप, प्रकाश वर्मा, बशीर सौदागर, वसंत त्रिभुवन, सलीम वैजापुरी, सुभाष बोहरा, सचिन ताजी, सावन राजपूत, डॉ.निलेश भाटिया, बळीराम राजपूत, पारस घाटे आदी उपस्थित होते.