वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा

वैजापूर ,​२​ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा सोमवारी (ता.02) येथे पार पडला.

या मेळाव्यास मराठवाठा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, जेष्ट नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे,  मनोज घोडके,  जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष विशाल शेळके, जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपुत,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रतापराव निंबाळकर, दत्तात्रय पाटील वाकलेकर, महिला आघाडीच्या सुनीता साखरे, हिराताई जाधव, बाळासाहेब भोसले, सुरजनाना पवार, एल.एम.पवार, पंचायत समिती सदस्य विनायक गाढे. साईनाथ  आहेर, विजय पवार, दिगंबर मोरे, आनंदराव निकम बाळु पाटील शेळके.पंचायत समिती सदस्य दिगंबर मोरे. प्रदीप भाऊ, ज्ञानेश्वर घोडके, आर.व्ही.सांवत,   गणेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.