वैजापूर शहरातील विविध विकास कामांची आ. बोरणारे व पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

वैजापूर,१८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्येपूर्ण योजनेतून व आमदार  रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने वैजापूर शहराच्या विविध विकासकामांसाठी मंजुर झालेल्या 45 कोटी रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या टिळक रोड व महादेव मंदीर रोड परिसरातील ड्रेनेज लाईनच्या कामांची पाहणी आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान व भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी यांनी शनिवारी केली.

नवीन उभारण्यात येणाऱ्या स्टडी सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय, दशक्रिया विधी घाट व स्व. रामराव नाना पाटील नाट्यगृह या सर्व कामांचे नियोजन करून जागेची पाहणी केली.


यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, अभियंता प्रकाश पाटील, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, नगरसेवक पारस घाटे, स्वप्निल जेजुरकर, ज्ञानेश्वर टेके, डॉ. परेश भोपळे, शैलेश चव्हाण, दिनेश राजपूत, गोकुळ भुजबळ, बबन त्रिभुवन, सखाहरी बर्डे, दशरथ बनकर, बजरंग मगर, गणेश खैरे, कमलेश आंबेकर, अमीर अली, संतोष वाघ, शंकर मुळे, बापू भैय्या साळुंके, रामकृष्ण पाटील जोरे, दिपक बोर्डे, सोहन पालेजा, श्याम साळुंके व संबंधीत अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.