शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ; जितेंद्र आव्हाडांच्या नियुक्तीवर अजित पवारांचा आक्षेप

मुंबई :-राष्ट्रवादीतून बंड करुन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. यावेळी त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे शरद पवारचं असल्याचं सांगतिल आहे. तसंच पक्ष आमच्यासोबत असून पक्षाच्या विकासासाठी काम करणार असल्याचही ते यावेळी म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीवर आक्षेप घेत अजित पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते आणि प्रतोदपदी नियुक्ती केली, पण ते काम विधानसभा अध्यक्षांचा आहे. ज्या विरोधी पक्षांची सर्वात जास्त संख्या असते. त्या पक्षाच्या नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात येते. आज जे करण्यात आलं ते आमदारांचा संभ्रम निर्माण करण्यासाठी केलं जात असल्याचं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आपल्याला असल्याने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे अजित पवार यांनी केली आहे.

सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणऊन सुनील तटकरे यांनी नियुक्ती केली आहे. तर आधीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती ही हंगामी होती, त्यांना आता जबाबदारीतून मुक्त करण्यात येत असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

रुपाली चाकणकर महिला प्रदेशाध्यक्ष

पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं सुनिल तटकरे यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे खासदार प्रफुल्ल पटेल आणि खास सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचं जाहीर केलं आहे.