भीम आर्मी सेनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वैजापुरात निषेध

वैजापूर ,​३०​ जून/ प्रतिनिधी :-भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (रावण ) यांच्यावर उत्तरप्रदेश मध्ये झालेल्या हल्ल्याचा वैजापूर तालुक्यातील सर्व आंबेडकर चालवळीतील पक्ष कार्यकर्त्यांनी भाई राजू आहेर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना गुरुवारी निवेदन देऊन निषेध केला.

यावेळी आंबेडकर चालवळीतील जेष्ठ नेते राजेंद्र बागुल, साहेबराव पडवळ, बाळासाहेब त्रिभुवन, जीवन पठारे, चंद्रसेन भोसले, श्रीकांत जाधव, प्रवीण शिंदे, वाल्मिक त्रिभुवन, अरुण गायकवाड, अंकुश त्रिभुवन, बाबासाहेब पगारे, अमोल आपटे, ऋषिकेश त्रिभुवन, काशिनाथ बागुल, विक्की त्रिभुवन आदी कार्यकर्ते उपस्थित होते