वैजापूर शहरात हनुमान जयंती उत्साहात साजरी

वैजापूर ,​६​ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरात हनुमान जयंती विविध कार्यक्रमाने व उत्साहात गुरुवारी (ता.06) साजरी करण्यात आली. भजन व हनुमान चालीसा पठण करीत व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

मुख्य कार्यक्रम श्री.संकट मोचन हनुमान मंदिरात विश्वस्त व भक्त भाविक यांनी आरती केली. प्रशांत कंगले, दशरथ बनकर,डॉ. निलेश भाटिया, शिवलिंग साखरे, गोपाल वेद, काशिनाथ भावसार, कैलास साखरे, सचिन उदावंत, केशव आंबेकर, धोंडीरामसिंह राजपूत, गणेश खैरे, काशिनाथ गायकवाड,बाबासाहेब गायकवाड, विनोद गायकवाड, पी.जी. पवार, अँड.मनोज दिवाकर यांनी आरती केली. गुरुजी चंद्रकांत कुलकर्णी, प्रतीक कुलकर्णी, जगदीश अंकुश, चेतन कनगरकर यांनी पूजा पाठ केला. त्याचप्रमाणे शहरातील काटे मारुती मंदिर, परदेशी मढी मारोती मंदिर, ब्राह्मचारी मंदिर, पाटील गल्ली मारोती मंदिर, लाडवाणी गल्ली मारोती मंदिर, लाडगाव रोड मंदिर आदी ठिकाणी हनुमान जयंती उत्साहात साजरी होऊन भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले.  सुमनबाई गायकवाड, अलका साखरे, जिजाबाई गायकवाड व असंख्य महिलांनीही आरती केली. पोलीस पाटील गुलाबराव साळुंके, उत्तमराव साळुंके, बापू साळुंके, वसंतराव साळुंके, सुधीर लालसरे, महेश जाधव यांची उपस्थिती होती.