पालखेड येथील पत्रकारास फिल्मी स्टाईलने पाठलाग करून मारहाण ; शिवसेनेच्या विभाग प्रमुखासह तेरा जणांना अटक

वैजापूर ,१९ मे /प्रतिनिधी ;- वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील एका पत्रकारास मारहाण करणाऱ्या शिवसेना विभागप्रमुख प्रमुखासह 13 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रविण यादव भाडाईत असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.ते एम एच बिंदास या न्यूज चॅनलचे संपादक आहेत.त्यांना पालखेड येथील शिवसेना विभागप्रमुख नंदकिशोर भाऊसाहेब जाधव व त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली.
काही दिवसांपासून भाडाईत व जाधव या दोघांमध्ये वाद आहे.त्यामुळे या कारणावरुन त्यांना मारहाण झाली.भाडाईत हे त्यांच्या कारमध्ये बसलेले असताना आरोपी तेथे आले.नंदकिशोर जाधव व त्याच्या सहकाऱ्यांनी लगेच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.ते कसेबसे त्यांच्या तावडीतून निसटले.मात्र सर्वांनी मोटार सायकल वर त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली.तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी प्रविण भाडाईत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदकिशोर भाऊसाहेब जाधव,जयकृष्ण पारसनाथ शेळके, सौरभ पारसनाथ रोठे, पवन संजय जाधव, तानाजी पारसनाथ जाधव, राहुल चंद्रभान जाधव, उमेश चंद्रभान जाधव, सुरेश ठकचंद जाधव, बाळासाहेब चांगदेव जाधव, योगेश कचरू धनाड, चेतन गोरख जाधव, दिपक शिवाजी जाधव व राजू म्हसू जाधव सर्व रा.पालखेड या तेरा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार रज्जाक शेख हे करीत आहेत.