वैजापूर येथे सेवानिवृत्त प्राध्यापकाची आत्महत्या

वैजापूर ,२५ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.24) सकाळी घडली. या प्रकरणी वैजापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अण्णासाहेब नाथा थेटे (65 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नाव आहे. येथील विनायकराव पाटील महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. स्टेशन रोडवर त्यांचे चारचाकी वाहन प्रशिक्षण केंद्र आहे. आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.