चोरवाघलगाव येथे कृषी विभागाच्यावतीने कृषी संजीवनी सप्ताह साजरा

वैजापूर ,२९ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव येथे तालुका कृषी विभाग वैजापूरच्यावतीने कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. कृषी विभागातर्फे २५ जून ते १ जुलै या दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी वेंकट ठक्के प्रभारी मंडळ कृषी अधिकारी माधव गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी शास्त्रज्ञ डॉ. पिसोरे यानी जमीन सुपीकता दिना निमित्त पिकासाठी मातीचे महत्त्वं माती मधील सेंदिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, मुक्त चुना, पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्यानुसार पीक नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रकाश देशमुख यांनी शेतीत सेंद्रिय खताचा वापर वाढवून माती परिक्षणानुसार पिकांचे नियोजन करण्याचे आवाहन केले. शेती मशागत करतांना रोटव्हेटर चा वापर टाळावा अशी सुचना त्यांनी केली.
उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव यानी सेंद्रिय खत, कंपोस्ट खत गांडूळ खत, जैविक खताचा वापर यामध्ये अझोटोबॅक्टर,रायझोबियम,पीएसबी , ट्रायकोड्रामा,बिवेरिया बसिनिया, यांचा वापर व पिकांची फेर पालट विषयी मार्गदर्शन केले.तालुका कृषी अधिकारी व्यकट ठक्के यांनी खरीप हंगामातील पीक नियोजन विषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी बंधूना माती परीक्षण अहवाल वाटप, ज्वारी व बाजरी मिनी किटवाटप करण्यात आले तसेच शेडींग नेट व एसआरटी तंत्रद्यान राबविलेल्या शेतकरी बांधवांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी मंडळ कृषी अधिकारी माधव गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहायक अर्चना सोनावणे  कृषी मित्र,दत्तू घुले, सरपंच कैलास सातपुते, उपसरपंच दादासाहेब मोईन, श्रावण मोईन यांनी परिश्रम घेतले. मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे, कृषी पर्यवेक्षक दत्ता पुंड,कैलाश गावडे,संजय वंमने, गोरख साळुंखे, अण्णासाहेब मोईन, उद्धव मोईन, सुरेश मोईन,गणेश घुले,गणेश शेळके, सागर मोईन, राजेंद्र मोईन कैलाश घुले,बाळू राउत,  वांकर राऊत, संतोष राऊत, आप्पा पवार, पोपट वाघ,दत्तू घुले, अशोक मोईन, विक्रम मोईन, वसंत मोईन, विठ्ठल मोईन, भिवसेन मोईन,बाळू पवार. गंगाधर दहीते, बाबासाहेब त्रिभुवन, छगन त्रीभुवन,अशोक वाघ,अरुण भोरकडे, सुनील जाधव, रामनाथ जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.