वसंत क्लब वैजापूर या संस्थेच्या नवीन संचालक मंडळाची बिनविरोध निवड ; उपाध्यक्षपदी डॉ. शिंदे तर सरचिटणीसपदी जफर खान

Displaying IMG-20211226-WA0171.jpg

वैजापूर,२६ डिसेंबर /प्रतिनिधी :-वसंत क्लब वैजापूर या संस्थेची आज विशेष सर्वसाधारण सभा होऊन या सभेत संस्थेची सन 2021-24 या तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध  निवड करण्यात आली. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर हे संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.उपाध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.व्ही.जी.शिंदे यांची तर सरचिटणीसपदी जफर ए.खान यांची व सहसचिवपदी डॉ.संतोष गंगवाल यांची निवड करण्यात आली. 

संस्थेचे जेष्ठ सभासद ऍड. आसाराम पाटील रोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सर्वसाधारण सभेस भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी,माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत,बाजार समितीचे उपसभापती विष्णुभाऊ जेजुरकर, संजय पाटील निकम,मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष भगवाननाना तांबे, पत्रकार  कांतिकुमार जैन,नगर्द सावन राजपूत, दामोदर पारीख, घनश्याम वाणी यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.
त्यांच्या या निवडीचे आमदार प्रा रमेश बोरनारे, डॉ  दिनेशभाऊ परदेशी् माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष साबेरखान उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, न.प.भाजपा गटनेते दशरथ बनकर , नगरसेवक दिनेश राजपुत गोकुळ भुजबळ, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र सांळुके नगरसेवक डॉ निलेश भाटीया,सभापती पती  मनाजी पा मिसाळ,वसंत त्रिभुवन  पत्रकार भानुदास धामणे प्रशांत त्रिभुवन अमोल राजपुत समीर लोंढे दिपक बरकसे किशोर सांळुकेआदींनी अभिनंदन केले 
** खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न
संस्थेचे जेष्ठ सभासद ऍड. आसाराम पाटील रोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सर्वसाधारण सभेस भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, मा.नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत,बाजार समितीचे उपसभापती विष्णुभाऊ जेजुरकर, संजय पाटील निकम, मर्चंट बँकेचे मा.अध्यक्ष भगवाननाना तांबे, पत्रकार कांतिकुमार जैन,मा.नगराध्यक्ष राजुसिंग राजपूत, सावन राजपूत, दामोदर पारीख, घनश्याम वाणी यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.