तरुणीवर बलात्कार ,बांधकाम मिस्त्रीला अवघ्या तासाभरात अटक

औरंगाबाद/प्रतिनिधी

जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी बांधकाम मिस्त्रीला क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या तासाभरात मंगळवारी (दि. 25) रात्री अटक केली. अक्रम पठाण अय्युब पठाण (29, रा. कासंबरी दर्गा,गट नं. 92, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याला 28 आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यु. न्याहारकर यांनी बुधवारी (दि. 26) दिले.

प्रकरणात 25 वर्षीय तरुणीने तक्रार दिली. तक्रारीनुसार, आरोपी अक्रम पठाण हा पिडितेच्या काकाच्या घराचे बांधकाम करित होता. तेथे दोघांची ओळख झाली. 12 फेब्रुवारी पिडिता ही काकाच्या घराजवळ बसलेली असतांना आरोपीने तिचे तोंड दाबुन तिला घराच्या वरच्या मजल्यावर नेले व तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर दोन—तिन वेळा बलात्कार केला. दरम्यान काही दिवसांनी पिडितेला चक्कर आल्याने तिला तिच्या आई व नातेवाईकांनी दवाखान्यात आणले. तेथे डॉक्टरांनी तिला सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. याघटनेनंतर पिडितेने आई व नातेवाईकांना घडलेल प्रकार सांगितला. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी आरोपीने गुन्हा करतांना बळाचा वापर केल्याचे समोर येत असल्याने त्या अनुषंगाने तपास करणे आहे. आरोपीचे कोणी सहकारी आहेत याचा तपास करावयाचा आहे. तसेच आरोपीने गुन्हा करतेवेळी परिधान केलेले कपडे जप्त करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *