पिस्टल, जीवंत काडतुस व चाकु बाळगणाऱ्या  दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ

औरंगाबाद/प्रतिनिधी

गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्टल, जीवंत काडतुस व चाकु बाळगणाऱ्या  दोघांच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत (दि. 27) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यु. न्याहारकर यांनी बुधवारी (दि. 26) दिले.  गणेश हरीभाउ फुले (30, रा. धनगर गल्ली, हर्सुल) व राहुल बाळासाहेब सोनवणे (29, रा. किनगांव ता. फुलंब्री ह.मु. गोकुळनगर, सुरेडवाडी, हर्सुल) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्याचे नाईक सोपान जनार्धन डकले (33) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, 23 आॅगस्ट रोजी सायंकाळी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे हे सहकारी उपनिरीक्षक गणेश राउत, शिपाई दिपक सुरोशे, मलखानसिंग नागलोत यांच्यासह हद्दीत गस्त घालत असतांना रात्री पावणे दहा वाजता झाल्टा फाटा येथुन बुलेटवर (क्रं. एमएच—20—डीके—4777) जाणार्या आरोपींना पाठलाग करुन आडगाव फाटा येथे पकडले. त्यांच्या अंगझडतीत पिस्टल, जीवंत काडतुस, मोबाइल, चाकु व बुलेट असा सुमारे एक लाख 46 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघा आरोपींना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी दरम्यान आरोपी राहुल सोनवणे याने पिस्टल व काडतुस नेवासा (जि. अहमदनगर) येथुन आणल्याची कबुली दिली. दरम्यान कोठडीची मुदत संपल्याने दोघा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यता आले असता आरोपींनी पिस्टल, जिवंत काडतुस नेवासा येथुन कोणाकडून घेतली याचा तपास करणे आहे. आरोपींनी या शस्त्रांचा उपयोग करुन गुन्हा केला आहे का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी न्यायालयाकडे केली. विंनती मान्य करुन न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत वाढ केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *