औरंगाबादमध्ये २ हजार कोटींचा पीएनजी  गँस पाईप लाईन प्रकल्प

पीएनजी गँस लाईनचे काम लवकरात मार्गी लावा.- खा.डॉ.भागवत कराड  
घरगुती यासह औद्योगिक वसाहतीला देखील स्वस्तात  गँस मिळणार

औरंगाबाद –  खा.डॉ. भागवत कराड यांच्या प्रयत्नामुळे औरंगाबादेत पी.एन.जी. लाईन टाकण्याबातीत निर्णय झाला असून,घरगुती यासह औद्योगिक वसाहतीला देखील स्वस्तात  गँस मिळणार असून मोठा फायदा मिळणार आहे. दोन हजार कोटी रु. खर्च असलेल्या पीएनजी  गँस पाईप लाईनचे महत्वपूर्ण प्रकल्पाचे काम मार्गी लावले असून,त्यासंदर्भात भारत गँस रिसोर्सेस प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक (सी.एम.डी.) श्रीपाद  मांडके यांनी आज औरंगाबादेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.लवकरात लवकर कामे सुरु करा असे त्यांनी अधिकाऱ्यांना  बैठकीत निर्देश दिले. 

Displaying IMG-20200825-WA0024.jpg

यावेळी इंडिअन ओईल कंपनीचे रुपेश राठोर ,आर .बी करंजगावकर ,बीपीसीएल रुपेश रंजन , हिंदुस्तान ओईल कंपनीचे  व्यवस्थापक मांगीलाल , अमित पाठक उपस्थितीत होते.औरंगाबाद शहर हे औद्योगिक आणि पर्यटन दृष्ट्या झपाट्याने विकसित होत आहे. शहरात लोकसंख्या आणि  वाहनाची वाढती संख्या लक्षात घेता  नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याविषयी खासदार डॉ.भागवत कराड यांनी प्रयत्न केले आहे. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्यावर त्यांनी शहरात   गँसची  पाईप लाईन टाकण्यासाठी   पुढकार घेतला आहे.                

गुजरात  राज्यातील  दहेज ते गोदावरी बेसिन, (विशाखापट्टणम) पर्यंत नैसर्गिक गँस पाईप लाईन जात आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे व्हाल्व आहे. तेथून थेट पाईप लाईनद्वारे    व्हाया  अहमदनगर ,वाळूज आणि औरंगाबाद शहरात पर्यंत टाकण्यात येणार आहे.  भारत पेट्रोलीअम नैसर्गिक वायू रिसोर्स  कंपनीला  पाईप लाईन टाकण्याचे  काम मिळाले  आहे.   १७५ कि.मी. अंतरावरून २४ इंची स्टील पाईपद्वारे औरंगाबाद येथे   गँस     उपलब्ध होणार आहे. याबरोबर सीएनजी पेट्रोल पंप्स देखील   सुरु करण्यात येणार आहे.  प्रामुख्याने  वाळूज औद्योगिक, शेंद्रा – बिडकीन डीएमआयसीतील  उद्योजका बरोबर शहरातील तब्बल पाच लाख कुटुंबाना   घरगुती गँस  उपलब्ध होणार आहे. तब्बल दोन हजार कोटी रु. खर्च येणार आहे. औरंगाबाद शहरात अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी  दोन वर्ष कालावधीत लागणार आहे.   नैसर्गिक   गँस हा  लिक्वीफाईड गँस पेक्षा स्वस्त  व  सुरक्षित आहे. नैसर्गिक वायूची    गळती आणि  स्फोट होण्याचा धोका नाही   हवेत विरघळत असल्याने घरगुती वापरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.व त्याची किमत देखील इतर कंपन्या पेक्षा पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी आहे. १२५  ते २० मि.मी.व्यास  जाडीच्या    पाईप लाईन असणार आहे. त्यासाठी घराघरात मीटर बसविण्यात येणार आहे. गस चा वापर हा मीटर रीडिंगवर दिसेल व त्यानुसार बिल आकारण्यात येणार आहे.   पाईप लाईनसाठी प्रत्यक्ष कामास नोव्हेबर महिन्यात सुरवात होणार असून,    विविध खात्याच्या परवानग्या मिळविण्यासाठी   पत्रव्यवहार सुरु करण्यात आला आहे.डी.पी असोसीएट कन्सल्टनट संस्था काम पाहत आहे.  औरंगाबाद  महानगर पालिका  ,सार्वजनिक बांधकाम ,सिडको ,रस्ते विकास , औद्योगिक मह्मंडळ ,यासह विविध विभागाच्या परवानग्या लवकरच मिळणार आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासंदर्भात खासदार डॉ.भागवत कराड प्रयत्नशील असून केंद्रीय नैसर्गिक वायू गसचा स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याने  या कामास वेग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *