वैजापूर ते सिंदखेडराजा ‘जिजाऊ रथ यात्रा’ रवाना

वैजापूर ,११ जानेवारी / प्रतिनिधी :-राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मदिवस उत्साहात सहभागी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  या दिनाच्या एक दिवस पूर्वला 11 जानेवारी 2023 रोजी सकाळी वैजापूर येथून “जिजाऊ रथ” सिंदखेडराजा येथे रवाना झाला.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या रथाला सामाजिक कार्यकर्ते व स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी ध्वज दाखविला. मराठा महासंघ शाखा वैजापूरच्यावतीने मोती भाऊ वाघ हे गेल्या आठ वर्षांपासून “जिजाऊ रथ” सिंदखेडराजा येथे नेतात व उत्सवात सहभागी होतात. श्री. राजपूत यांनी जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत या रथ यात्रेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रथयात्रा प्रमुख मराठा सेवा संघाचे मोती भाऊ वाघ, राहुल मापारी व बाबासाहेब साळुंके हे सारथी, दीपाली खैरनार, ऋतुजा चांगदेव खैरनार, शिवभक्त फकिरा गलांडे, अक्षय नजन यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.