वैजापूर शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६१५​ घरकुलाचे काम पूर्ण ; लाभार्थ्यांना घराच्या चाव्या सुपूर्द


वैजापूर ,२६ जून/ प्रतिनिधी :-पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वैजापूर शहरात ८१५ पैकी ६१५​ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून घरकुलाचे काम पूर्ण झालेल्या प्रत्येक प्रभागातील एक लाभार्थ्याला नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व उपनगराध्यक्ष साबेर खान यांच्या हस्ते सोमवारी (ता.26) प्रातिनिधीक स्वरूपात घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. हक्काचे घरकुल मिळाल्याचा आनंद यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. 

नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान व पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात आतापर्यंत ८१५ पैकी ६१५​ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. घरकुलाचे काम पूर्ण झालेल्या प्रत्येक प्रभागातील एक लाभार्थ्यांला प्रातिनिधीक स्वरूपात सोमवारी (ता.26) घरकुलाची चावी सुपूर्द करण्यात आली.

यावेळी नगरसेवक दशरथ बनकर, प्रकाश चव्हाण, उल्हास ठोंबरे, सचिन वाणी, राजूसिंग राजपूत, शैलेश चव्हाण, सुरेश तांबे, गणेश खैरे, सखाहरी बर्डे, इम्रान कुरेशी, बिलाल सौदागर, स्वप्नील जेजुरकर, दिनेश राजपूत, रियाज शेख, डॉ.परेश भोपळे, डॉ.निलेश भाटिया आदी उपस्थित होते.