शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला वैजापुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष ; पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

वैजापूर ,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्याचे वृत्त समजताच वैजापुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष करण्यात आला.

सायंकाळी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शिंदे गटाचे आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्यासह  कार्यकर्त्यांनी जमा होऊन जल्लोष केला. आ.रमेश बोरणारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. फटाके फोडून व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले व जोरदार घोषणाबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, खुशालसिंग राजपूत, कल्याण पाटील जगताप, वसंत त्रिभुवन, संजय बोरणारे, रणजित चव्हाण, महेश बुनगे, रहीम खान, प्रमोद कुलकर्णी, नगरसेवक शेख रियाज, इम्रान कुरेशी, डॉ.निलेश भाटिया, स्वप्नील जेजुरकर, बिलाल सौदागर, सलीम वैजापुरी, श्रीकांत साळुंके, युवासेनेचे अमीरअली, श्रीराम गायकवाड, अमोल बोरणारे, खलिल मिस्तरी, गोटूसिंग राजपूत, राम बारसे, शंकर मुळे, मधुकर त्रिभुवन, सुनील वाळुंज, संतोष वाघ, रामकीसन जोरे, वल्लभ सोनवणे, शाम साळुंके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.