वैजापूर शहरातील भाजी मंडई समोरील गोदमाला आग

वैजापूर ,२६ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील येवला रस्त्यावर असलेल्या नविन भाजीमंडई समोरील एका गोदमाला सोमवारी (ता.26) दुपारी दीड वाजताच्या सुमाराला अचानक आग लागली.‌ या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र गोडाऊन मध्ये ठेवलेले प्लास्टिकचे ग्लास व इतर साहित्य जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे.‌ आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.‌ घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी आग विझवण्यासाठी पाण्याचा बंब पाठवला. पालिकेच्या स्वच्छता विभागातील प्रमोद निकाळे, गणेश निकम, कैलास त्रिभुवन, गणेश त्रिभुवन, विकी त्रिभुवन या कर्मचाऱ्यांनी आग विझवली.