वैजापूर येथील कुख्यात गुंड राहूल शिंदे अखेर स्थानबद्ध ; हर्सूल कारागृहात रवानगी

वैजापूर ,​३​ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील वडारवाडा भागात राहणारा राहुल गणेश शिंदे (वय २२) या कुख्यात गुंडास अखेर छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील त्याच्या आलेखाची दखल घेतली.पोलिसअधीक्षक मनीष कलवानिया व वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलिसअधीक्षक महक स्वामी यांनी ही कारवाई केली. 

जिल्हाधिकारी यांनी एक जुन रोजी राहुल शिंदे याच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे‌. पोलिसअधीक्षक मनीष कलमानिया यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी सातव्या आरोपी विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड व इतर धोकादायक कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली म्हणजेच एम पी डी ए कायद्याअंतर्गत करून हरसुल कारागृहात स्थानबद्ध केले आहे. राहुल शिंदे यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात साथीदारांसह घातक शस्त्राने दुखापत पोचवणे, जबरी चोरी, बेकादेशीर अडवणे, शांतता भंग करण्यासाठी अपमानित करणे, पोलिसांच्या रखवालीतून पळून जाणे, बलात्कार व अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी त्याचे विरुद्ध यापूर्वीच एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही त्याचे गुन्हेगारी कृत्य थांबत नसल्याने त्यास हर्सुल कार्यालयात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसअधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर  पोलिसअधीक्षक सुनील लांजेवार, पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, पोलिस नाईक दीपक सुरासे, प्रशांत गीते यांनी ही कारवाई केली.