वैजापूर येथे लिंगायत समाज मठाच्या विस्तारीकरण कामाचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर ,​३​ जून/ प्रतिनिधी :-येथील लिंगायत समाजाच्या मठाच्या विस्तारीकरण कामासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाचे भूमीपूजन आ.रमेश पाटील बोरणारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी  (ता.03) करण्यात आले.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजूसिंग राजपूत, उद्योजक उमेश वाळेकर, लिंगायत समाजाचे जेष्ठ नागरिक रविंद्रअप्पा साखरे, अँड. प्रवीण साखरे, वैजिनाथअप्पा मिटकरी, भाजपचे शहराध्यक्ष दिनेशसिंग राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, गणेश खैरे, डॉ.निलेश भाटिया, स्वप्नील जेजुरकर, पारस घाटे, वसंत त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती होती. लिंगायत समाजाच्यावतीने उद्योजक उमेश वाळेकर यांनी आ. बोरणारे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत पत्र्याचे शेड, पेव्हर ब्लॉक व सुशोभीकरासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.आ.बोरणारे यांनी निधी देण्याचे आश्वासन यावेळी बोलताना दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. अँड.प्रवीण साखरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास मनोज पाटणी, महेश बुणगे, अमोल बोरणारे, प्रेमसिंह राजपूत, लिंगायत समाजाचे अविनाश साबरे, संतोष साखरे, प्रसाद वाळेकर, राकेश झळके, संतोष चिनके, सुभाष मुळे, बंडू नाना साखरे, विनोद फसके, नंदू भगुंडे, विलास भुजबळ, शिवलिंगआप्पा साखरे, भीमा शंकर साखरे, मीरा शेटे,गायत्री पाटणी, वैशाली साखरे, यांच्यासह प्रभागातील महिला-पुरुष वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होता.