वैजापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सायकलिस्ट व स्विमिंग ग्रुपतर्फे अभिवादन

वैजापूर ,२६ जून/ प्रतिनिधी :-सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त शहरातील सायकलिस्ट व स्विमिंग ग्रुपतर्फे सोमवारी (ता.26) सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अभिवादन करण्यात आले.

पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी सर्वप्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. धोंडीरामसिंह राजपुत यांनी सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने समाजातील तळागाळातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्प करण्याची सर्वांना प्रतिज्ञा दिली व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला‌. सर्व सायकलपट्टू व जलतरणपटु यांनी “सायकल चालवा-आयुष्य वाढवा” देखना है कल – तो आज चलाओ सायकल” सायकल “आपण चालवू या – आरोग्य आपले राखू या,” “सायकलची सवारी-जीवनाला तारी”, अशा घोषणा देत फेरी काढली. आरोग्याचा ही संदेश दिला. या प्रसंगी योगेश गाढे, दिलीप अनर्थे, चरणसिंह  काकरवाल, राजेंद्र पगार, जयराम खाडे, सचिन लाडवाणी, पारस अनर्थे, वेदिका गाढे, डॉ.ईश्वर अग्रवाल, योगेश कुंदे, ज्ञानेश्वर जाधव इत्यादी उपस्थित होते.