आ.बोरणारे वैजापुरात परतले:समर्थकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन

तालुक्याच्या विकासासाठी शिंदे बरोबर – आ.बोरणारे

वैजापूर ,५ जुलै  /प्रतिनिधी :- शिवसेना पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आ.रमेश पाटील बोरणारे पंधरा दिवसानंतर वैजापूर शहरात पोहोचल्यानंतर समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी व मोटारसायकल रॅली काढून कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. विशेष म्हणजे या मेळाव्यास समर्थकांसह सत्तेच्या बाजूने राहण्याची भूमिका घेतलेल्या काही शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले व गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत  त्यांच्यासोबत असलेले आ.रमेश बोरणारे यांचे आज सकाळी वैजापूर शहरात आगमन झाल्यानंतर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयापासून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत भाजपचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आ.बोरणारे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी व फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत केले. शहरातील राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्यांना आ.बोरणारे यांनी अभिवादन केले. त्यानंतर वैष्णवी लान्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. 

गेल्या अडीच वर्षात तालुक्याच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात निधी मंजूर करून आणला असून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनेच आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे आ.बोरणारे यांनी मेळाव्यात बोलतांना सांगितले. मा.नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रामहरीबापू जाधव, राज्याचे माजी उद्योग संचालक जे.के.जाधव आदींची यावेळी भाषणे झाली.आ.बोरणारे यांनी योग्य निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, महेश बुणगे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, नगरसेवक डॉ.निलेश भाटिया, इम्रान कुरेशी, सखाहरी बर्डे, ज्ञानेश्वर टेके, पारस घाटे, युवासेनेचे अमीर अली, श्रीराम गायकवाड, श्रीकांत साळुंके, सचिन कर्डक, वैजापूर ग्रामीणचे सरपंच दौलतराव गायकवाड, प्रकाश मतसागर, सुभाष आव्हाळे, संतोष कासलीवाल, डॉ.संतोष गंगवाल, उपशहरप्रमुख खलील मिस्तरी, सलीम वैजापुरी, रणजित चव्हाण, संजय बोरणारे, अमोल बोरणारे, कमलेश आंबेकर, अशोक हाडोळे, प्रभाकर जाधव, सिताराम पाटील वैद्य, वसंत त्रिभुवन, बंडू राजपूत, आवेज खान, गोरखनाथ शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष 


आ. बोरणारे यांचे आगमन झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, गणेश खैरे, शैलेश चव्हाण, सुरेश तांबे, बजरंग मगर, सूर्यकांत सोमवंशी, गिरीश चापानेरकर, किरण व्यवहारे, शैलेश पोंदे, प्रशांत कंगले, सन्मित खनिजो आदींनी “शिवसेना -भाजप युतीचा विजय असो”, “”बोरणारे सर आगे बढो हम तुम्हारे साथ हैं” अशी घोषणाबाजी करून जल्लोष करून आ. बोरणारेंचे स्वागत केले.