वैजापूर येथे रविवारी प्रगतीशील साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षपदी अस्लम मिर्झा तर स्वागताध्यक्षपदी डॉ.दिनेश परदेशी

वैजापूर,९ डिसेंबर /प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्हा प्रगतीशील लेखक संघाच्या पुढाकारातून वैजापूर शहरात रविवारी प्रगतीशील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त जेष्ठ साहित्यिक ऍड.अस्लम मिर्झा यांची तर स्वागताध्यक्षपदी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.

Displaying IMG-20211208-WA0077.jpg
भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी


जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साहित्य आणि वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा या भूमिकेतून हे एक दिवसीय प्रगतीशील साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वैजापूर पंचायत समितीच्या कै.विनायकराव पाटील सभागृहात आयोजित या साहित्य संमेलनात पुस्तक प्रदर्शन, ज्वलंत व महत्वपूर्ण विषयांवर परिसंवाद व प्रगतिशील विचारांच्या लेखक व कवींचे विचार ऐकावयास मिळणार आहे. हे साहित्य संमेलन ग्रामीण भागातील साहित्यिक व रसिकांना अत्यंत मार्गदर्शक व प्रोत्साहित  करणारे असणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांनी या साहित्य संमेलनविषयी बोलताना  सांगितले.संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील प्रगतीशील लेखक व स्थानिक लेखक व कवी प्रा.भीमराव वाघचौरे, डॉ.सुभाष भोपळे, अहेमद पठाण, ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, शशांक पाटील, शमीम सौदागर, नजमी आदी प्रयत्नशील आहेत.