शूर योद्धा गेल्याने जागतिक स्तरावर पसरली शोककळा, विविध देशांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली:- कुन्नूरजवळ भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत शहीद झाले आहेत. एक शूर योद्धा गेल्याने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर शोककळा पसरली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच भारतीय सेलिब्रिटींनी ही जनरल रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. 

बिपिन रावत 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले. यानंतर त्यांची आता सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिपीन रावत यांनी 1 जानेवारी 2020 पासून या नवीन पदाचा पदभार स्वीकारला होता. 30 डिसेंबर रोजी सरकारने सीडीएस Chief Of Defence Staff) पदासाठी लष्कराच्या नियमांमध्ये बदल करून वयोमर्यादा 65 वर्षे केली आहे. त्याची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली होती.

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी व्यक्त केला शोक

बुधवारी पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनीही जनरल रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पाकिस्तानचे अध्यक्ष जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी (CJCSC) लेफ्टनंट जनरल नदीम राजा आणि लष्कर प्रमुख (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी CDS जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या दुःखद मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.

इस्रायलने शोक व्यक्त केला

इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गँट्झ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मी इस्रायली संरक्षण खाते आणि भारतीय जनतेच्या वतीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि दुःखद अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल शोक व्यक्त करतो.’.

कठीण काळात तैवान भारतासोबत

तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने लिहिले की, ‘या दु:खद हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जणांचे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांप्रती आमची तीव्र संवेदना. या कठीण काळात तैवान भारतासोबत आहे.’

श्रीलंकने व्यक्त केला शोक

श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे म्हणाले, “तामिळनाडूमधील दुःखद हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत, श्रीमती रावत आणि इतरांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. श्रीलंकेच्या लोकांच्या वतीने, मी त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्व भारतीयांना माझ्या संवेदना व्यक्त करतो.

ऑस्ट्रेलियाकडून श्रद्धांजली

ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त म्हणाले, ‘हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सीडीएस जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत आणि इतरांच्या कुटुंबियांप्रती आमची तीव्र संवेदना आहे. जनरल रावत यांच्या कार्यकाळात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण संबंध प्रचंड वाढले आहेत.

रशिया म्हणाला – भारताने एक नायक गमावला

रशियन राजदूत म्हणाले, “आज हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत, श्रीमती मधुलिका रावत आणि इतर 11 अधिका-यांच्या दुःखद निधनाबद्दल कळून खूप दुःख झाले. भारताने आपला महान देशभक्त आणि समर्पित नायक गमावला आहे.

भूतानकडून शोक

भूतानचे पंतप्रधान म्हणाले, ‘भारतातील हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल जाणून खूप दुःख झाले, ज्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला. मी आणि भूतानचे लोक भारत आणि त्यांच्या कुटुंबांसाठी प्रार्थना करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.’

कसा होता जनरल बिपिन रावत यांचा प्रवास

सीडीएस बनण्यापूर्वी बिपिन रावत 27 वे लष्करप्रमुख होते. लष्करप्रमुख बनण्याआधी, 1 सप्टेंबर 2016 रोजी त्यांची भारतीय लष्कराचे उप-सेनाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

बिपिन रावत यांचं शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये शिक्षण

जनरल बिपिन रावत हे सेंट एडवर्ड स्कूल, शिमला आणि नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकसालाचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1978 मध्ये त्यांना इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथून अकरा गोरखा रायफल्सच्या 5 व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले, जिथे त्यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. त्यांना दहशतवादविरोधी कारवायांमध्ये काम करण्याचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

विशिष्ट सेवांसाठी सन्मानित

जनरल बिपिन रावत यांना उच्च उंचीवरील लढाऊ क्षेत्र आणि दहशतवादविरोधी मोहिमेत काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी पूर्व सेक्टरमध्ये इन्फंट्री बटालियनचे नेतृत्व केलं आहे. काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय रायफल्स सेक्टर आणि इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्वही केलं आहे. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्सचे माजी विद्यार्थी, जनरल बिपिन रावत यांनी लष्करात 38 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा केली आहे.

जनरल बिपिन रावत को उच्च ऊंचाई वाले युद्ध क्षेत्र, और आतंकवाद रोधी अभियानों में कमान संभालने का अनुभव है. उन्होंने पूर्वी क्षेत्र में एक इन्फैंट्री बटालियन की कमान संभाली है. एक राष्ट्रीय राइफल्स सेक्टर और कश्मीर घाटी में एक इन्फैंट्री डिवीजन की भी कमान संभाली है. रक्षा सेवा स्टाफ कॉलेज, वेलिंगटन और राष्ट्रीय रक्षा कॉलेज पाठ्यक्रम के एक पूर्व छात्र, जनरल बिपिन रावत, ने सेना में 38 से अधिक वर्षों तक देश की सेवा की है. यावेळी त्यांना शौर्य आणि विशिष्ट सेवांसाठी UISM, AVSM, YSM, SM ने सन्मानित करण्यात आलं आहे.

त्यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षा’ आणि ‘नेतृत्व’ या विषयावर अनेक लेख लिहिले आहेत, जे विविध मासिके आणि प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून संरक्षण अभ्यासात एम.फिल पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीजमध्येही डिप्लोमा केला आहे. जनरल बिपिन रावत यांनी मिलिटरी मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीजवर त्यांचे संशोधन पूर्ण केले आहे असून 2011 मध्ये त्यांना चौधरी चरण सिंग विद्यापीठ, मेरठ येथून डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) प्रदान करण्यात आली आहे.