वैजापूर शहरात जागतिक योग दिनानिमित्त भाजपतर्फे योग वर्गाचे आयोजन

वैजापूर ,२१ जून/ प्रतिनिधी :-  वैजापूर शहरात मोदी@९ जनसंपर्क अभियानअंतर्गत तसेच जागतिक योग दिना निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे  भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तसेच माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली योग वर्गाचे आयोजन करण्यात आले. वैजापूर शहरात विविध ठिकाणी आयोजित या योग वर्गात भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. 

या योग वर्गात भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक दशरथ बनकर, डॉ. हेडगेवार पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत कंगले, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप ,कैलास पवार, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, माजी नगरसेवक गणेश खैरे, गोकुळ भुजबळ, राजेश गायकवाड, बजरंग मगर, बाळासाहेब चव्हाण,चांगदेव उघडे, अशोक धसे, बापू देशमुख, सावनसिंग राजपूत, प्रकाश माळी, प्रा.जवाहर कोठारी, गणेश राजपूत, सुरेश धुमाळ, भिमाशंकर साखरे, गोविंद दाभाडे, रमेश बनसोड, जीवन राजपूत, विजय पवार, प्रेम राजपूत, शैलेश पोंदे, सोनू राजपूत, प्रदीप चव्हाण, निलेश पारख, गौरव दोडे, विनय संचेती, गिरीश चापानेरकर, सन्मित खनिजो, नवीन श्रीवास्तव, ज्ञानेश्वर धुमाळ, ज्ञानेश्वर शिरसाठ, सचिन दाढे, दत्ता खैरे, बबलू बस्वेकर, प्रशांत सोमवंशी, मुकेश राजपूत, मनोज पाटणे, अहिरे, अमिताभ पंजाबी, कल्याण काळे यांच्यासह वैजापूर येथील योगा ग्रुप, सायकल ग्रुप व जलतरण ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते.