वैजापुरात जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून घेतले योगासनचे धडे

वैजापूर ,२१ जून/ प्रतिनिधी :-  आजच्या मानवाला निरोगी,सक्षम व सुदृढ राहून मानवता टिकवायची असेल तर मानवी जीवनात योगासन, प्राणायाम व सूर्यनमस्कार करण्याशिवाय पर्याय नाही असे उदगार माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी योग दिनी बुधवारी (ता.21) पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या “योग जागृती”फेरीला ध्वज दाखविताना केले. फेरी नंतर त्यांनी शाळेत योगासन प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दाखवून त्यांच्या कडून योगासने व प्राणायाम करून घेतले. तसेच या वर्षीचे योग दिनाचे घोष वाक्य विद्यार्थ्यांना सांगून त्याप्रमाणे आचरण ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. 

या प्रसंगी मुख्याध्यापिका नीता पाटील, पर्यवेक्षक एम.आर.गणवीर, माजी मुख्याध्यापक जी.जी. राजपूत, योग शिक्षक बी.बी.जाधव, सुवर्णा बोर्डे, राजश्री बंड, सुनीता वसावे, लता सुखासे, ज्योती दिवेकर, पल्लवी भाकरे,श्रीमती घोलप, श्री.रावकर,  संदीप शेळके यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी दीड तास योगासने शिकून त्याप्रमाणे कृती केली शेवटी सुवर्णा बोर्डे यांनी आभार मानले.